BSN news network mul प्रतिनिधी गणेश गेडाम 🚨 स्वच्छ भारत अभियानाचा फक्त गाजावाजा की प्रत्यक्ष अंमलबजावणी?स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणाऱ्या नगर परिषद, मूल येथील कोनशिलेवर शेण फेकण्यात आले की फेकायला लावले गेले?या प्रश्नाचे उत्तर नंतर मिळेल. मात्र, अनेक दिवसांपासून ही कोनशिला शेणाने माखलेली असूनही नगर परिषद, मूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे ही कोनशिला नगर परिषद, मूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहे. तरीही ती स्वच्छ करण्याची तसदी घेतली जात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.प्रश्न उपस्थित होतात…नगर परिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांना हे दिसत नाही का?की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे?की “स्वच्छ भारत अभियान” फक्त कागदावर आणि भाषणांपुरतेच मर्यादित आहे?स्वच्छतेचा संदेश देणारी कोनशिलाच अस्वच्छ असेल, तर सामान्य नागरिकांना कोणता संदेश दिला जात आहे?— जनतेचा सवाल






