
प्रभाग क्रमांक ५ मध्ये दोन मृत्यू; वाढदिवसाच्या जल्लोषावर नागरिकांचा सवालमूल : नगर परिषद मूलच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याच प्रभागातील नगरसेविका वाढदिवसाचा केक कापून फटाके फोडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.एकीकडे प्रभागात दोन नागरिकांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरलेली असताना दुसरीकडे वाढदिवसाचा जल्लोष सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रसंगी संवेदनशीलता दाखवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या प्रकारामुळे “दुःखाच्या प्रसंगी जल्लोष योग्य आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये दोन मृत्यू; लोकप्रतिनिधींच्या संवेदन शीलतेवर नागरिकांचा सवालमूल : नगर परिषद मूलच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुःखद प्रसंगी संबंधित नगरसेविकेने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.ज्या नागरिकांनी मतदान करून बहुमताने नगरसेविकेला निवडून दिले, आज त्याच प्रभागातील नागरिकांचे निधन झाले असताना त्यांच्या अंत्ययात्रेला किंवा किमान त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करण्यासाठी वेळ मिळाला नाही का?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, याच काळात वाढदिवसाचा केक कापून फटाके फोडण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका बाजूला नागरिकांच्या घरात दुःखाचे वातावरण असताना दुसऱ्या बाजूला वाढदिवसाचा जल्लोष होत असल्याने लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ज्यांनी मतदान करून प्रतिनिधी निवडून दिले, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही लोकप्रतिनिधींची सामाजिक जबाबदारी नाही का? असा सवाल आता प्रभागातील नागरिकांकडून केला जात आहे.










