
ब्रेकिंग न्युज . मुल पोलिसांची तात्काळ कारवाई घटना आणि कारवाईची थोडक्यात माहिती:घटना:दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:४५ ते ११:१५ च्या सुमारास तांदूळ घेऊन MIDC, मूल येथे जाणारा ट्रक (क्र. CG 04 MU 7886) रस्ता चुकल्यामुळे उमा नदी टी-पॉईंटवर थांबला. तेथे उपस्थित असलेल्या काही इसमांनी रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने ट्रक अडवून चालक कुलेश्वर रेवाराम साहू यांना चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून दारू, सिगारेट व पैशांची मागणी केली. चालक तेथून निघून गेल्यावर आरोपींनी कार व मोटरसायकलवरून पाठलाग केला आणि MIDC परिसरातील एका स्टील कंपनीच्या गेटसमोर ट्रक पुन्हा अडवला.त्यांनी चालकास मारहाण करून खिशातील १६२०/- रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली, ट्रकची चावी काढली आणि दगडफेक करून ट्रकचे सुमारे १०,०००/- रुपयांचे नुकसान केले.पोलीस कारवाई:मूल पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावला.अटक/ताब्यात घेतलेले: ८ आरोपींना अटक केली असून २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना (नाबालिक) पालकांच्या ताब्यात देऊन नियमानुसार कारवाई केली.फरार आरोपी: १ आरोपी (यश संगमवार) फरार असून त्याचा शोध सुरू आहे.अटक करण्यात आलेले आरोपी:अनिकेत उर्फ गुड्डु दिलीप शेंडे (वय २३)नयन सतीश जिल्लेवार (वय १८)अभय चंचल रामटेके (वय २२)तनिष्क ओम मंडलेकर (वय २१)अनिकेत उर्फ साहिल कैलास अंधारे (वय २२)मयुर केवलदास खोब्रागडे (वय २१)सौरभ गणेश मंगर (वय १९)मोहम्मद अख्तर उर्फ दानिश अब्दुल कदीर शेख (वय २३)कारवाई करणारे पोलीस अधिकारी व पथक:मार्गदर्शन:पोलीस अधीक्षक: आयुष नोपानीअपर पोलीस अधीक्षक: ईश्वर कातकडेउपविभागीय पोलीस अधिकारी (मूल): सत्यजीत आमलेपोलीस निरीक्षक: विजय राठोडतपास व कारवाई करणारे गुन्हे शोध पथक:सहाय्यक पोलीस निरीक्षक: सुरेश कन्नाकेपोलीस अमलबजावणी/कर्मचारी: नरेश कोडापे, दिलीप आदे, नरेंद्र वाकडे, प्रकाश चिकराम, आणि शंकर बोरसरे






