बीएस न्यूज नेटवर्क मुल संपादक प्रतिनिधी गणेश गेडाम मूल :- मूल शहरातील मुख्य बस स्थानकावर आज सकाळी *९ वाजताच्या सुमारास* एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. जवळ जाऊन पाहिले असता तो मृत असल्याचे स्पष्ट झाले, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती मूल पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतकाची ओळख पटवली असता तो लिलाधर कुळमेथे, रा. दहेगाव (मानकापूर) येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मूल येथे पाठविला आहे. नेमके मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.









