, डोंगरगाव (चिखली) येथे गुरुवारी घडलेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक योगेश पेंदोर (वय ३५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ
ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू; डोंगरगाव (चिखली) येथे शोककळा
डोंगरगाव (चिखली), दि. ३० जुलै : डोंगरगाव (चिखली) येथे गुरुवारी घडलेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक योगेश पेंदोर (वय ३५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, योगेश पेंदोर हे ट्रॅक्टरने शेतात चिखलटी करण्यासाठी जात असताना अचानक ट्रॅक्टरवरील त्यांचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर शेतात पलटी होऊन त्यांच्या अंगावर पडला. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माहिती अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
योगेश पेंदोर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, डोंगरगाव (चिखली) परिसरात शोककळा पसरली आहे.
उप संपादक : गणेश गेडाम


